Posts

Showing posts from October, 2017

उंबरठ्यावरची पिढी....

Image
८०...९०...१०० सुटलोऽऽऽऽऽऽऽऽ.

ही साधारण या पिढीची खेळात राज्य कुणी घायचं हा निर्णय घेण्याची पद्धत होती. हो, खेळात, घराबाहेर पण खेळायचो आम्ही. मैदानात खेळणारी माझी पिढी. मुलांच्या खेळाचा व्हिडिओ गेम आणि मोबाईल या ब्लू व्हेलनी बळी घेतला नव्हता. तसं या ८०-९० च्या पिढीबद्दल या आधी ही खूप जणांनी लिहिलंय, त्यामुळे मी काय अजून दिवे ओवाळणार असं वाटणं साहजिक आहे.

या पिढीच सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पाहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे ही पिढी कायम उंबरठ्यावर राहिली. टेप रेकॉर्डर ज्या पिढी साठी खूप मोठी मिळकत होती. मार्क शीट आणि टीव्हीच्या येण्याने यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी. कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन गाडी गाडी खेळणं यात काहीही कमीपणा नव्हता. सळई जमिनीत रुतवत जाण हा काही खेळ असू शकतो का ? पण होता. कैरी तोडणं ही यांच्या साठी चोरी नव्हती. आणि कुठल्याही वेळी कुणाचंही दार वाजवणे  यामध्ये कसलेही एथीक्स तुटत नव्हते. मित्राच्या आईने जेऊ घालणं यात कसलाही उपकाराचा भाव आणि त्याच्या बाबांनी ओरडण यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची…