Posts

Showing posts from December, 2017

जायचं का परत खेड्याकडे?

Image
दोन्ही जावई आज टीव्ही वर झळकले पण सासऱ्यांच्या जीव मात्र नखात आला. एकीकडं एका जावयाने कांद्याचं विक्रमी उत्पन्न काढलं म्हणून सरकारकडून बक्षीस मिळालं तर दुसरा जावई एल्फिन्स्टन ला झालेल्या चेंगराचेंगरीतून जेमतेम वाचला. पोरीनं बसून खावं म्हणून तिला मुंबईला कामाला असलेला मुलगा पहिला. दुसरीला मात्र नाईलाजास्तव एका शेतकऱ्याला दिली ते पण तिला काम करावं लागणार नाही या बोलीवर.
           पहिली जिला सुखात राहावी म्हणून मुंबईत दिली तिचं काही नवऱ्याच्या पगारात भागेना. पगार चांगला होता आणि वेळच्या वेळी वाढत पण होता पण महागाई काय जवळ येऊ देत नव्हती. नवरा 6 ची ट्रेन पकडतो म्हणून हिची धावपळ 5 पासूनच. धावपळ करूनदेखील काही ताजे नव्हतेच मिळत खायला. गटारावरच्याच भाज्या. पगारात भागत नाय म्हणून मग शिवण मशीन. त्यात पण जास्त पैसे मिळेनात म्हणून मग आणखी असले छोटे मोठे उद्योग करत बस. नवरा काय 9 वाजेपर्यंत पोचायचा नाही रात्री. पोचल्यावर लोकलच्या गर्दीचा सगळा राग बायको आणि पोरांवर. घरात ना कसला संवाद ना शांती. पोरांना इंग्लिश शाळेत टाकलं पण नाव सोडून त्यातही काही विशेष नव्हतंच. आणि तरीही फी मात्र डोळे पांढरे करणा…

गावाकडच्या मुली.....

शहरी आणि ग्रामीण या दोन संकल्पनांच्या विशिष्ट प्रतिमा आपण कायम आपल्या मनात जपत असतो. ग्रामीण राहणीमान, तेथील जीवन याची एक विशिष्ट चौकट आपल्या डोक्यात असते. विशेषतः गावाकडच्या मुली म्हणजे ‘गावंढळ’, ‘अडाणी’ किंवा ‘बिचाऱ्या’ अशीही एक धारणा आपण तयार केलेली असते. ही धारणा खरंच तेवढी खरी आहे का त्यामागची सामाजिक कारणे काय आहेत याचाच आढावा घेऊयात.

समाजसेवेची आवड असणाऱ्या एक ज्येष्ठ बाई भेटल्या होत्या. बोलता बोलता त्यांनी विषय काढला की गावाकडच्या मुलींचे फार हाल असतात असं ऐकलं. जर तुझ्या ओळखीतली एखादी मुलगी असेल तर सांग मी सांभाळेन तिला. घरकामाला पण उत्तम असतात तिकडच्या मुली. मला नेमका उद्देश लक्षात आल्याने मी अस्वस्थ झालो. गावाकडची मुलगी म्हणजे काय प्रतिमा आहे त्यांच्या डोक्यात हेच डोळ्यासमोर आलं. पण विचार करता करता लक्षात आलं की गावाकडची मुलगी म्हणजे डोक्यावर घागर घेऊन पाणी आणणारी, शेतात राबणारी आणि फार फार तर पायी पायी शाळेत जाणारी. यापलीकडे गावाकडची मुलगी शहराच्या चित्रात नसते. गावातल्या मुली खरंतर खूप लहानपणीपासून आपल्या भावंडांची आई बनून जातात. घर सांभाळतात. मन लावून अभ्यास करतात. कारण…

Mobile Theft? No worries now!!!

Mobile Theft? No worries now!!!If u lose your mobile in India, you can get it back.

Got an interesting fact to share.. 
Nowadays each one of us carries very costly or latest mobile devices which always creates fear in mind  that it may be stolen.
Each mobile carries a unique IMEI no. i.e. International Mobile Equipment Identity No which can be used to track your mobile anywhere in the world.
How it works?Dial *#06# from your mobile.Your mobile shows a unique 15 digit.Note down this number anywhere but not in your mobile as this is the number which will help trace your mobile in case of its theft.Once stolen you just have to E-mail this 15 digit IMEI No. tocop@vsnl.netwith detail mentioned below.    Your name:____________________ Address:______________________ Phone model:_________________ Make:_________________________ Last used No.:_________________ E-mail for communication:_____ Missed date:___________________ IMEI No :_______________________
      5. Your Mobile will be traced within next 2…

ब्रेथलेस मराठी गीत

ब्रेथलेस मराठी गीत

मन शहारे काहुरे दूर देशी मी चालले वाटे सोडू नये गाव, आसू डोळयांस या सांगे गूढ पायवाट राही मागे मागे मागे मागे धागे पाणंदीचे मनी, गाव आठवांचा जागे सय मनात मावेना, धग उरात सोसेना सोस सोसण्याचा भारी, त्याला वेसच दिसेना वेळू लपेटून वाहे, माझ्या गावची ही नदी जणु चाकातून बुक्का उडे गावची ही माती माती भुरळ घालते, नाही विरळ हे नाते नाते विरहातसुध्दा गीत मातीचे या गाते, गावी कौलारू घरांना शोभे आंब्याचे तोरण उंच पिंपर्णीची झाडे साद घालती बेचैन, गेरू रंगवावा तसा रंग रंगतोया जीव, शीव ओलांडता खूपे, जसा निवडुंगाचा पेव, मन इथेच दंगते, मन इथेच सांडते ओवी ओवीत गंफुनी मन भजनी रंगते, मन वाऱ्यावर वाहे वारा चाफ्याशी या बोले चाफा रामाच्या पुढयात माझी भातुकली मांडे, बालपण वेचले मी रामाच्या या पोळीवर, डाव खेळताना मोडे नेमकाच घडीवर घडी घडीला आठवे आज रामाचे देऊळ, जाते देवळाची वाट माझ्या वाडयाच्या जवळ, माझा वाडा चिरेबंदी, भव्य दार हुरमंजी, मन चौकातच मध्ये घुटमळे वृंदावनी, घुमे अडणा दाराचा वाडाभर करकर त्याचा रूबाबच सांगे, कुणा नाही त्याची सर मुख्य वाडयाच्या गस्तीला ठाके चौघडा-सोपा सांज पहाटेला दुमद…

स्वातंत्र्याचा लढा झाला

स्वातंत्र्याचा लढा झाला
स्वातंत्र्याचा लढा झाला,  बापूजी म्हणाले 'खेडयांकडे चला',
'चला' म्हणून तर गेले बापूजी,  पण फिरकले कोण?
कोण्या बुडूख अंधारात,  गुडूप निजलेल्या,  दाटी-वाटीनं बुझलेल्या,  बुझून विझून थिजलेल्या, हिरव्या रानात भिजलेल्या,  ठिपक्या ठिपक्या एवढुश्शा चिमुकल्या  खेडयापाडयांकडे फिरकणार तरी कोण?
फिरकली ती एस.टी.!  तांबडी माती उडवत,  दिमाखात मिरवत,  गावं गावं जोडत, की गावात शहरं घुसवत..  तिचा लाल पिवळा रंग,  संग शहरांशी करून गेला, गावालाही चकचकाटाची  स्वप्नं तेवढी दाखवून गेला..
झगझगत आली मागून लखलखणारी वीज,  नीज उडवली तिने,  गावं उजळवली तिने, आणला रेडीओही तिने,  तिनेच टी.व्ही. दाखवला,  दिपून गेले डोळे, 'गाव' दिसेनासा झाला!
झाला झाला खणाणत टेलिफोनचा प्रवेश..  देश जोडला म्हणे त्याने, केला पोस्टाचा भार कमी,  ...अंतरही कमी!  केली आतुरता कमी!  म्हणे माणूस जोडला,  शब्दाशब्दाने सांधला,  म्हणे दुरावा मोडला की वेळेत तोलला?
झाला गेला सारा बदल...  आहे तो असा आहे! शिक्षणाचं वारं आहे,  प्रगतीला उधाण आहे, लोकल ग्लोबल झालं  ओझं संस्काराचं आहे! 
गाव कात टाकणारे,  गाव न…